मुंबई – शेअर बाजारात आज नव्या सप्ताहाची सुरुवातही घसरणीनेच झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०० अंकांपेक्षा जास्त अंकांनी घसरला. या आठवड्यात बाजार असाच खाली जात राहिला तर मागील ३० वर्षांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.शेअर बाजारातील ही अनिश्चितता आणि सततची घसरण ही सामान्य बाब नाही. मागील ३० वर्षांत असे फक्त तीन वेळा झाले आहे.यापूर्वी १९९६, २००१ आणि २००४ मध्य अशी घसरणी झाली होती.ग्राहकांकडून मागणीत घट आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेतही दबाव दिसून आला. त्यामुळे भारतासह आशियाई बाजारांमध्ये घसरण सुरू झाली आहे.
शेअर बाजारात घसरण सुरूच ३० वर्षांचा विक्रम मोडणार ?
