प्रयागराज – उत्तर प्रदेश प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्याचत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमावर स्नान करून गंगापूजन केले.
उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळांची त्रिवेणी संगम संकुल येथे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ५४ मंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर योगी आदित्यनाथ हे मंत्र्यांसोबत त्रिवेणी संगमावर येथे पोहचले. त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत गंगास्नान केले आणि सूर्याला अर्घ्य दिले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्र्यांनी त्रिवेणी संगमावर पूजा आणि प्रार्थना केली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. पाण्यातही ड्रोन तैनात करण्यात आलो होते. कुंभमेळा हा भारतीयांच्या एकता,सौहार्द आणि मानवतेचा सोहळा आहे, असे योगी म्हणाले.