मुंबई – ‘मेट्रो २ अ’ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतर करण्यात आले. यात पहाडी एक्सर, वळनई व पहाडी गोरेगाव या स्थानकांचा समावेश आहे. यासंदर्भात मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) परिपत्रक जारी केले. ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेचा दुसरा टप्पा जानेवारी महिन्यात सुरू झाला. यातील ‘पहाडी गोरेगाव’ स्थानकाचा परिसर ‘बांगूरनगर’ जवळ आहे. त्यामुळे या स्थानकाला हेच नाव द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या मागणीची दखल घेत ‘पहाडी गोरेगाव’ स्थानकाचे नामांतरण ‘बांगूरनगर’ असे करण्यात आले आहे. त्याचबरोबर बोरिवली पश्चिमेला असलेले ‘पहाडी एकसर’ हे स्थानक शिंपोली परिसरात आहे आणि याच नावाने येथील परिसर ओळखला जातो. त्यामुळे हे नाव बदलले जावे, अशी मागणी तेथील श्री गावदेवी ग्रामस्थ मंडळाने केली होती. त्यानुसार या स्थानकाचे नाव आता ‘शिंपोली’ असे करण्यात आले आहे. तर, ‘वळनई’ स्थानकाचे नामांतरण ‘वळनई-मीठ चौकी’ असे करण्यात आले आहे.
‘मेट्रो २ अ’ च्या तीनस्थानकांचे अखेर नामांतर
