मेक्सिकोत वॉटर पार्कमध्ये गोळीबार ७वर्षाच्या चिमुकल्यासह ७ जण ठार

मेक्सिको : अमेरिकेच्या सेंट्रल मेक्सिकोतील वॉटर पार्कमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात ७ वर्षाच्या चिमुकल्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला गुआनाजुआटो राज्यातील कोर्टाझार शहरातील एका रिसॉर्टमध्ये झाला. सुट्टी साजरी करण्यासाठी अनेक लोक येथे जमले होते. अचानक हल्लेखोर रिसॉर्टच्या वॉटर पार्कमध्ये घुसले आणि त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या हल्लेखोर पकडले गेलेले नाहीत. हल्ल्याचे कारणही समोर आलेले नाही. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.

हा हल्ला मेक्सिकोच्या वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी घडला आहे. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर रिसॉर्टचेही बरेच नुकसान केले. तसेच ओळख पटू नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून पळ काढला. दरम्यान, त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. गोळीबाराच्या या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. तेथील लोकांमध्ये घबराट पसरली. घटनेनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. वातावरण शांत झाले असले तरी, सध्या हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यातून फरार आहे. गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात वर्षांच्या अल्पवयीन मुलापैकी तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मेक्सिकोच्या गुआनाजुआटो राज्यात घडली आहे. गुआनाजुआटो हे कृषी आणि औद्योगिक केंद्र मानले जाते. हे मेक्सिकोचे सर्वात हिंसक राज्य आहे. असे प्रकार येथे सातत्याने घडत असतात. गेल्याच महिन्यात ग्वानाजुआटो येथे गोळीबाराची घटना घडली होती. सशस्त्र हल्लेखोरांनी १० जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top