मुंबईत उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी घराचा उंबरठा उंच करण्याचे आवाहन

मुंबई – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव सुरू आहे. यातील लेप्टोच्या प्रसाराला कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने नवीन ४- डी पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.यामध्ये घरात उंदीर शिरू नये म्हणून घराचा उंबरठा उंच करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सध्या मुंबईत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया,डेंग्यू, स्वाइन फ्लू,लेप्टो,गॅस्ट्रो, कावीळ आणि चिकनगुनिया आदी साथीच्या आजारांनी हाहाकार माजविला आहे. खासगी आणि पालिका रुग्णालयात या आजारांचे रुग्ण वाढत चालले आहेत. यातील लेप्टोसारख्या घातक आजाराचा प्रसार करणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेच्या किटकनाशक विभागाने नवीन ४- डी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये घरात उंदरांचा शिरकाव होऊ नये यासाठी घरातील दरवाजाचा उंबरठा उंच करणे,उंदराला लपण्यासाठी जागा मिळेल असे अडगळीत सामान ठेवू नका, जगण्यासाठी खाणे गरजेचे असले तरी उंदराला खाद्यपदार्थ घालणे बंद करा, उंदीर घरात शिरला तर त्याला पकडण्यासाठी पिंजरा ठेवा आणि शेवटचा पर्याय म्हणजे उंदराला विष घालणे आदी उपाययोजना राबविण्याचे आवाहन पालिका प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top