मी त्यांना नोटीसच पाठवतो! रामराजेंबाबत अजित पवार कठोर

सातारा – रामराजे निंबाळकर फलटणच्या प्रचारात दिसत नाही, मी त्यांना नोटीस पाठवतो असे कठोर उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी काढले. रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात असले तरी फलटणमध्ये पक्षाचा प्रचार करताना ते दिसत नसल्याची चर्चा आहे. रामराजे निंबाळकर यांचे दोन्ही बंधू एक संजीवराजे निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. अजित पवार गटाचे आमदार असलेले दीपक चव्हाण यांनीही तुतारी हाती घेतली. त्यामुळे अजित पवार गटाकडून फलटणचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सचिन कांबळे हे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र महायुतीतून अजित पवार गटाला फलटणची जागा मिळाली. रामराजे ज्या पक्षात आहेत त्याच पक्षाला जागा सुटली तरीही रामराजे निंबाळकर प्रचारात दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात अजित पवार संतापले आहेत. रामराजे निंबाळकर हे प्रचार करताना दिसत नाही, मी त्यांना नोटीस पाठवणार असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. दरम्यान, फलटणमध्ये कोणत्याच उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी रामराजे निंबाळकर यांची भूमिका आहे. तर फलटणचे आमदार अजित पवार गटाकडून यापूर्वीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top