वॉशिंग्टन :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड त्यांच्यावर आधीच लैंगिक शोषण केल्याचा आरोप असतानाच आता आणखी एका महिलेने पुन्हा याच प्रकारचा आरोप केला आहे. विमानात विनयभंग केल्याचा या महिलेचा दावा आहे. तिने हा दावा न्यायालयात केला असून आपली बाजूही मांडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावले आहे. त्यामुळे याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई होणार का याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
न्यूयॉर्क येथील न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीवेळी या महिलेने दावा केला. १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात विमानामध्ये प्रवास करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक छळ केला, असे तिचे म्हणणे आहे. जेसिका लीड्स असे त्यांचे नाव असून त्यांनी लेखक ई. जीन कॅरोल यांच्या बलात्कार आणि मानहानीच्या प्रकरणात माजी राष्ट्रपतींविरुद्ध साक्ष देताना यांनी हे आरोप केले आहेत. दरम्यान, जेसिका यांनी केलेले सर्व आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले.