मुंबई – दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुन्या असलेल्या हेरिटेज दर्जाच्या मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी केली जाणार नाही,तर या जलाशयाची दुरुस्ती केली जाणार असून या कामाचा शुभारंभ पावसाळ्यानंतर केला जाईल,अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली.या दुरुस्तीच्या निर्णयामुळे याठिकाणी असलेली झाडे आणि हँगिंग गार्डन कायम राहणार आहे.
मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी करायची की दुरुस्ती याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समितीची निवड केली होती. या समितीने जलाशयाची पाहणी केल्यानंतर या जलाशयाची दुरुस्ती करणेच योग्य ठरेल असा अहवाल सादर केला होता. त्यानंतर आयआयटी मुंबईनेही या जलाशयावर अभ्यास केला आणि तसाच केवळ दुरुस्ती करण्याचा निष्कर्ष काढला.
मात्र रुरकी आयआयटीच्या तज्ज्ञांनी पुन्हा एकदा यावर अभ्यास केला आहे.त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
दरम्यान,पालिकेने घेतलेल्या
निर्णयानुसार,या जलाशयाची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती केली जाणार आहे. शेजारी दुसरी टाकी ठेवणे गरजेचे आहे का हे पाहून तशी कार्यवाही केली जाणार आहे. टाकीची क्षमता आणि आकार पाहून ए आणि २ बी कप्प्याची मोठी दुरुस्ती केली जाणार आहे.