मुंबई – राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची हे अभियान राज्यभर राबवले जाणार असून आज त्याची सुरुवात झाली. या अभियानात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील सहभागी झाले. या अभियानाच्या माध्यमातून राजकीय नेत्यांवर सवाल उपस्थित करून जनतेच्या स्वाक्षर्या घेण्यात येत आहेत.
राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता राजकारणाचा चिखल झाला आहे. देशाला दिशा आणि विचार देणाऱ्या महाराष्ट्रातच हा किळसवाणा प्रकार सुरू आहे. निवडणुकीत एकदा का मत दिले, की राजकारणी लोकांना गृहीत धरू लागले आहेत. याच मानसिकतेमध्ये सध्या सर्व राजकीय पक्ष आल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील चीड व्यक्त करण्यासाठी मनसे राज्यभरात हे आंदोलन करत असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले
पुणे शहरात मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी, तर या. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात दिलीप धोत्रे यांनी उपक्रमास सुरुवात केली. राजकारणाचा चिखल झाला आहे का, माझ्या मताला काही किंमत नाही का, एकदा मतदान केले की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का, या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का असे विविध प्रश्न लिहिलेल्या फलकावर लोकांनी सह्या केल्या.