श्रीनगर -पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना तीन वर्षांनंतर १० वर्षांच्या वैधतेसह पासपोर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयातील दीर्घ कायदेशीर लढाईनंतर मेहबुबा यांना पासपोर्ट मिळाला आहे.त्यांच्या पासपोर्टची वैधता २०१९ मध्ये संपली होती आणि तेव्हापासून त्या नूतनीकरणासाठी प्रयत्न करत होत्या.
मेहबूबा मुफ्ती यांना पासपोर्ट दिल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण पुढे करत काश्मीरच्या सीआयडीने त्यावर आक्षेप घेतला होता.त्यावर मुफ्ती यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.या न्यायालयाने या वर्षी मार्चमध्ये मेहबूबा मुफ्ती यांना पासपोर्ट देणार की नाही याचा तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश पासपोर्ट प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार आता मुफ्ती हा नवीन १० वर्षांसाठीचा पासपोर्ट दिला आहे.
‘पिडीपी’च्या मेहबूबा मुफ्तीना तीन वर्षांनंतर नवीन पासपोर्ट
