नवी मुंबई : पार्टीसाठी मित्रांसोबत आलेल्या १९ वर्षीय तरुणीचा इमरतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या दोन मित्रांना तब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
पार्टीसाठी या तरुणांनी घरीच बियर आणल्या होत्या. मात्र तरुणी आणि तरुणीच्या मित्राने घरी नको म्हणून बाहेर जाऊन पार्टी करण्याचा प्लॅन आखला. प्लॅननुसार नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेलापुरातील सेक्टर १५ मधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथे पार्टीला सुरुवात झाली. पार्टी सुरू असतानाचा मृत मुलीचा मित्र बाहेर गेला होता. ही मुलगी देखील त्याच्या मागे आली आणि पाय घसरून खाली पडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुलीनेही बियर घेतली त्यामुळे ती पाय घसरून पडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून, ही मुलगी खरच पाय घसरून पडली की, या मागे काही घातपात आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
पार्टीसाठी आलेल्या तरुणीचा ७व्या मजल्यावरून पडून मृत्यू
