देशातील वयोवृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रा यांचे निधन

मुंबई – भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ४८ वर्षे त्यांनी महिंद्रा कंपनीच्या अध्यक्षपदी काम केले. या कालावधीत, महिंद्रा समूहाचा विस्तार ऑटोमोबाईल उत्पादक ते आयटी, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा यासारख्या इतर अनेक व्यवसाय विभागांमध्ये झाला.

केशब महिंद्रा हे यूएसए, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे पदवीधर होते. १९४७ मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर १९६३ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष झाले. विलीज कॉर्पोरेशन, मित्सुबिशी, इंटरनॅशनल हार्वेस्टर, युनायटेड टेक्नॉलॉजीज, ब्रिटीश टेलिकॉम आणि इतर बर्‍याच मोठ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान महिंद्राच्या संकेतस्थळानुसार केशब यांची केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांवर काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. २००४ ते २०१० पर्यंत, ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे, नवी दिल्लीचे सदस्य होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top