तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात मागील सलग तीन दिवस सुरू असलेल्या तेजीला आज चौथ्या दिवशी ब्रेक लागला. दिवसभराच्या चढ-उतारानंतर आज दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल ४०० अंकांनी घसरला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी शंभर अंकांनी घसरून २३,२०० अंकांवर तर सेन्सेक्स चारशे अंकांच्या घसरणीसह ७६६०० अंकांवर बद झाला. बँक निफ्टी सुमारे ७०० अंकांनी घसरून ४८,५५० च्या आसपास बंद झाला.आज मिडकॅप शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. एफएमसीजी आणि फार्मा शेअरमध्येही आज वाढ दिसली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top