मुंबई :
रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.५५ ते सायंकाळी ३.५५ वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकल विद्याविहार स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत सीएसएमटी-पनवेल व पनवेल सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल -ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी १०.३५ ते सायंकाळी ३.३५ या कालावधीत चर्चगेट- मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल.