बिजिंग
चीनमध्ये लोकशाही आणि मानवाधिकारसाठी लढ देणारे सामाजिक कार्यकर्ते झू झिओंग यांना 14 वर्षांची आणि डिंग जियाक्सी यांना 12 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा चीनमधील न्यायालयाने सुनावली. याप्रकरणाची न्यायालयात बंद दारआड जवळपास 1 वर्ष सुनावणी झाल्यानंतर ही त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. 2019 आणि 2020 मध्ये लोकशाही आणि मानवाधिकार लढाच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून या दोघांना अटक करण्यात आली होती. बीजिंगमधील स्थलांतरित कामगारांसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान, त्यांना 2013 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.
झू झिओंग आणि जियाक्सीयांना तुरुंगवासाची शिक्षा
