जपानमध्ये मुसळधार पाऊस लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

टोकियो – जपानच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे . त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.जपानच्या हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पूरस्थिती व दरड कोसळण्याच्या घटना घडतील असा इशारा दिला आहे. आपले जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहे. जपानच्या कागोशिमा, ओकिनावा शहरातील कुणीगामी या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अमामी भागातील ओकिनावा बेटावर तसेच योरोन शहरातही जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. गेल्या दोन दिवसात या भागात १२० मिलीमीटर पाऊस पडला. सखल भागातील नागरिकांना ताबडतोब उंचावरील भागात स्थलांतरीत करण्यात आले आहे. १९७८ सालानंतरचा हा सगळ्यात मोठा पाऊस असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top