बीजिंग- चीनमधील किंघाई-तिबेट पठारावर २० दशलक्ष टनांहून अधिक तांब्याचा साठा सापडला. चीनकडे आधीच मोठ्या प्रमाणात तांब्याचा साठा आहे. त्यामुळे आता चिनी उत्पादन कंपन्यांना तांबा कमी किंमतीत मिळण्याची शक्यता आहे.
या नव्या शोधामुळे तिबेट जगातील सर्वात मोठा तांबा उत्पादक प्रदेश बनण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यासोबत चीनच्या युलोंग, डुओलोंग, जुलोंग-जियामा आणि झिओंग्नु-झुनू येथे देखील मोठ्या प्रमाणात तांब्याचा साठा मिळतो. चीनमधील तांब्याला चिली, पेरू आणि काँगोसारख्या अनेक देशांतून मोठी मागणी आहे. त्यामुळे चीनचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढणार आहे.इलेक्ट्रिक, बॅटरीचे उत्पादन आणि औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी तांब्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. चीन आशिया, आफ्रिका आणि युरोपीय देशांत पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारणार असून तांब्याचा शोध या प्रकल्पांसाठीही वरदान ठरणार आहे.अशा परिस्थितीत देशांतर्गत संसाधने सुरक्षित करून चीन जागतिक पुरवठा साखळीतील जोखीम कमी करू शकतो.
चीनच्या किंघाई-तिबेट पठारावर तांब्याचा मोठा साठा सापडला
