रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे दरम्यान दुपारी १२ ते ५ या वेळेत बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी या घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसाळ्या आधी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मात्र, या कालावधीत परशुराम घाट बंद असला तरी या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागमोडी वळणाचा चिपळूण जवळील परशुराम घाट हा महामार्गावरील जवळपास तीन किलोमीटरचा घाट आहे. गेल्या वर्षी पावसामुळे याच घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला होता. संथ गतीने सुरु असलेले घाटातील चौपदरीकरणाचे काम हे याचे एकमेव कारण होते. कामावेळी अर्धवट केलेल्या डोंगर कटाईमुळे पावसाळ्यात या डोंगराची माती, दरड महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प व्हायची. गेल्या वर्षी पावसाळ्यात आठ वेळा दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. तर घाट दोन महिने बंद करण्यात आला होता. पावसाळा झाल्यानंतर या घाटाच्या कामाकडे विशेष लक्ष देण्यात आले. घाटातील रुंदीकरणाच्या कामालाही गती देत दिवस-रात्र काम सुरु ठेवण्यात आले. घाटाच्या मध्यापर्यंत काँक्रिटीकरण पूर्ण झाले. त्यानंतर आता अतिशय धोकादायक असलेला दरडीच्या डेंजर झोनमध्ये संरक्षण भिंतीचे काम सु