बीजिंग
चीनच्या लढाऊ विमानाने दक्षिण चीन समुद्रावरून आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत उड्डाण करणारे अमेरिकन हेर विमान रोखले. लष्कराने सांगितले की, ‘२६ मे रोजी चीनच्या फायटर जेटने अमेरिकन विमानाच्या कॉकपिट समोरून उड्डाण केले. त्यामुळे अमेरिकेच्या आरसी-१३५ या गुप्तचर विमानात बिघाड झाला.’
अमेरिकेच्या हवाई दलाने या घटनेचा व्हिडिओ जारी केला. मात्र, अद्याप चीनकडून याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
‘अमेरिका चीनवर नजर ठेवण्यासाठी अनेक वेळा आपली विमाने आणि जहाजे तैनात करते. चीनच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका आहे. अमेरिकेने या कारवाया थांबवायला हव्यात आणि चीनला दोष देणे बंद करावे. चीन स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलत राहील. दक्षिण चीन समुद्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन या क्षेत्रातील इतर देशांसोबत काम करेल. जेथे आंतरराष्ट्रीय कायद्याने उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे, आम्ही तेथे सुरक्षितपणे आणि संपूर्ण जबाबदारीने उड्डाण करू आणि आमच्या बाजूने काम सुरू ठेवू’, असे अमेरिकेतील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू म्हणाले.