केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ५ विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

अलाप्पुझा – केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या पाच विद्यार्थ्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. हे विद्यार्थी प्रवास करत असलेल्या कारची केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसला जोरदार धडक बसली. ही दुर्घटना केरळच्या अलाप्पुझा येथे कालरात्री घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात कलारकोडे येथे रात्री १०च्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा जागीच चक्काचूर झाला आणि या विद्यार्थ्यांना कारचे तुकडे करून बाहेर काढावे लागेल.
पाचही मृत तरुण हे शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होते. अपघातग्रस्त कारमध्ये सात जण प्रवास करत होते. दोघे जण जखमी झाले आहेत. तर बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. दरम्यान या अपघाताचे नेमके कारण काय होते? याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top