खेड – रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या बोगद्यातील एका मार्गिकेवरील वाहतूक उद्या सोमवारपासून खुली करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यामुळे वेगवान होणार आहे.
या बोगद्यातील तीन पदरी असलेली एक मार्गिका सुरू केली आहे. त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा ४० मिनिटांचा वेळ आता केवळ १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे.
कशेडीचा एक बोगदा वाहतुकीसाठी सुरू
