नवी दिल्ली – देशात फ्लिट टॅक्सी क्षेत्रातील अग्रणी कंपन्या ओला आणि उबर आयफोन आणि अन्य अँड्रॉईड मोबाईल फोनवरून केलेल्या बुकिंगवर वेगवेगळे भाडे आकारतात. याची दखल केंद्र सरकारने घेतली असून या कंपन्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स पोस्टमधून ही माहिती दिली आहे. ओला आणि उबर कंपन्या आयफोनवरून आलेल्या बुकिंगसाठी वेगळे भाडे आकारतात. तर अन्य अँड्रॉईड मोबाईल फोनवरून आलेल्या बुकिंगसाठी भाडे दर वेगळा आकारला जातो, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्यासाठी कंपन्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे, असे जोशी यांनी सांगितले.
आयफोन,अँड्रॉईडवर वेगवेगळे भाडे ओला, उबरला सरकारची नोटीस
