Home / क्रीडा / आचरेकर सर यांच्या स्मारकाचे अनावरण

आचरेकर सर यांच्या स्मारकाचे अनावरण

मुंबई –अनेक मातब्बर क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. मास्टर ब्लास्टर...

By: E-Paper Navakal

मुंबई –
अनेक मातब्बर क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसेप्रमुख या स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळेस आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय, माजी क्रिकेटर प्रवीण आमरे उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, गुरुपोर्णिमेला दरवर्षी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आजकालची गुरुपोर्णिमा हॅप्पी गुरुपोर्णिमा मेसेजवर थांबते. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावे असे मला वाटत होते. इथे मला पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. कॅप त्यांची ओळख होती. आज त्यांचे विद्यार्थी आहेत. क्रिकेटमध्ये थर्ड अम्पायर असतो. त्यावेळी चुकीचा निर्णय बदलता येतो. निवडणूकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर आजचे चित्र बदलले असते. अनधिकृत करायला गेल्यावर परवानगी लागत नाही. अधिकृत करायला गेल्यावर परवानग्या लागतात.

Web Title:
संबंधित बातम्या