वॉशिंग्टन – अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाने हाहांकार माजविला आहे.या चक्रीवादळाने झालेल्या पडझडीमध्ये आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सहा राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
लेन चक्रीवादळाने काल फ्लोरिडामध्ये प्रवेश केला.त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी २२५ किलोमीटर एवढा प्रचंड होता.त्यामुळे फ्लोरिडासह आसपासच्या जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, व्हर्जिनिया आणि अलाबामा या राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली.हेलेन हे या वर्षी अमेरिकेत धडकलेल्या सर्वात शक्तीशाली वादळांपैकी एक आहे. त्याला विनाशकारी श्रेणी चारमध्ये ठेवण्यात आले आहे.
या वादळाचा सुमारे १ कोटी २० लाख लोकांना फटका बसला आहे. वादळ इतर राज्यांमध्येही पसरण्याची शक्यता असून त्यामुळे सुमारे ५ कोटी लोकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वादळाचा हवाई वाहतुकीलाही जबर फटका बसला. एक हजारहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. तर चार हजारांहून अधिक उड्डाणांना विलंब झाला.
अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाने हाहाकार! १ कोटी लोक प्रभावित
