न्यूयॉर्क – जागतिक महासत्ता असलेली अमेरिका गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरली आहे. अमेरिकेतील केंटकी राज्यातील लुईसविले शहरात झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
या घटनेनंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यालाही ठार केले. गोळीबारानंतर लुईसविले मेट्रो पोलिस विभाग आणि लुईसविलेचे महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांनी लोकांनी पूर्व मेन स्ट्रीट आणि ओल्ड नॅशनल बँकेत जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. मेट्रोसेफ डिस्पॅचर्सच्या म्हणण्यानुसार ओल्ड नॅशनल बँकेच्या परिसरात गोळीबार झाल्याची बातमी आली. यानंतर काही वेळातच लुईसविले मेट्रो पोलिस अधिकारी आणि एफबीआय लुईसविले अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बेसबॉल स्टेडियम आणि केंटकी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आणि मुहम्मद अली सेंटर जवळ लुईसविलेच्या डाउनटाउन भागात ही घटना घडली.