प्रयागराज -उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. यावेळी त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यानंतर महाकुंभ मेळावा परिसरातील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यापूर्वी शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी कुंभमेळा आखाड्यातील संत आणि ऋषींचीही भेट घेऊन संवाद साधला.
अमित शहांचे त्रिवेणी संगमात कुंभस्नान
