संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

Tata Elxsi च्या शेअरमध्ये दोन दिवसांत २० टक्क्यांनी वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

टाटा समूहाच्या Tata Elxsi कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात २३५ टक्क्यांहून वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या दोन दिवसांत या कपंनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांना २५ हजार ६४२ टक्क्यांनी परतावा मिळाला असून गुंतवणूकदार मालमाल झाले आहेत.

सोमवारी या कंपनीच्या शेअरची किंमत ९ हजार १२६ रुपये होती. हा शेअरचा ऑल टाईम हाय किंमत असल्याचं बोललं जात आहे. मात्र नंतर तो ९०१० रुपयांवर बंद झाला. आज मंगळवारी या शेअरची किंमत घसरली असून ८ हजार ५१५ वर आली आहे.

Tata Elxsi, जिंदाल स्टील अँड पॉवर, व्होल्टास, वरुण बेव्हरेजेस आणि अॅस्ट्रल यांचा एमएससीआय मानक निर्देशांकात समावेश केला जाऊ शकतो. 2022 मध्ये Tata Elxsi चा शेअर 52.88 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्यात त्याची वाढ 37.25 टक्क्यांनी झाली आहे. 1999 मध्ये टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत 35 रुपये होती. 2014 मध्ये पहिल्यांदाच त्याची किंमत 300 रुपयांच्या पुढे गेली. यात आणखी गती येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami