Police Seize Humanoid Robot : मकाऊमध्ये मानवरूपी रोबोटला पोलिसांनी घेतले ताब्यात; रहिवासी संकुलात यंत्रमानवाला पाहून वृद्ध महिलेची उडाली तारांबळ

Police Seize Humanoid Robot : विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाचे जीवन सुसह्य होत असले, तरी कधीकधी तंत्रज्ञानाचा अतिरेक भीतीदायक ठरू शकतो, याचाच प्रत्यय चीनमधील मकाऊ शहरात आला. येथील एका गजबजलेल्या निवासी संकुलात चक्क एका मानवरूपी रोबोटला (Humanoid Robot) पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेची […]
Surajkund Mela Accident: जत्रेत आनंददायी प्रवास बनला काळ! झुलता पाळणा कोसळला; लोकांना वाचवताना पोलिसाचा मृत्यू

Surajkund Mela Accident: हरियाणातील फरिदाबाद येथे भरलेल्या जगप्रसिद्ध ‘सूरजकुंड’ जत्रेत शनिवारी संध्याकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली. जत्रेतील एक मोठा झुलता पाळणा अचानक कोसळल्याने या दुर्घटनेत 13 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, संकटात सापडलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी देवदूतासारखे धावलेले पोलीस निरीक्षक जगदीश प्रसाद यांना आपला जीव गमवावा लागला आहे. बचावकार्य करताना बजावले कर्तव्य मिळालेल्या माहितीनुसार, […]
Police Cleared in Akshay Shinde Encounter : स्वसंरक्षणासाठीच अक्षय शिंदेचा एनकाऊंटर पोलिसांना न्यायिक समितीने क्लीन चीट दिली

Police Cleared in Akshay Shinde Encounter – बदलापूर येथील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगाने पोलिसांना निर्दोष ठरवत त्यांना क्लीन चिट दिली आहे. अक्षयवरील गोळीबार हा स्वसंरक्षणासाठी करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आयोगाने मान्य केला आहे. पण आरोपीला व्हॅनमधून […]
Buldhana News: बुलडाण्यात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या ३४ जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; दगडफेकीत दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना..

Buldhana News: – बुलडाण्यातील (Buldhana News) बावनबीर येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली.. हि घटना शनिवारी रात्री सरकारी दवाखान्या (GOVT Hospital) जवळ घडली. या दगडफेकीत आठ ते दहा नागरिक जखमी देखील झाले होते. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाही त्यांच्या वाहनावर पुन्हा दगडफेक झाली. अखेर पहाटे तीन वाजता पोलिसांच्या (Police) संरक्षणात […]
मुस्लिम मुख्याध्यापक नको! शाळेतील टाकीत विष टाकले; श्रीराम सेनेचा तालुकाध्यक्ष अटकेत

बंगळुरू- मुस्लिम मुख्याध्यापकाला (Muslim principal) हटवण्यासाठी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव (Belgaon) जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी श्रीराम सेनेचा (Sriram Sena) तालुका अध्यक्ष सागर पाटील (Sagar Patil) याच्यासह नागनगौडा पाटील (Naganagouda Patil) व कृष्णा मदार (Krishna Madar) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. […]
डान्सबार काढता ! बायका नाचवता! लाज वाटत नाही? अनिल परबांची टीका

मुंबई –राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam)यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली या डान्सबारचा (savali Dance Bar) मुद्दा उबाठाचे (UBT) आमदार अनिल परब (MLA Anil Parab) यांनी उचलून धरला आहे. परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लिलता पसरावायला लाज वाटत नाही […]
बुलडाण्यात डॉक्टरला मारहाण; मनसे नेत्यावर गुन्हा दाखल

बुलडाणा- मनसेचे (MNS) बुलडाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव याने मेहकर येथील एका खाजगी रुग्णालयात (Private hospital) ज्युनियर डॉक्टरला (Junior Doctor) मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ (Video) समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. संबंधित डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस (Police) ठाण्यात जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गाभणे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. लक्ष्मण […]
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण; आरोपपत्र सादर! ११ जणांची नावे

पुणे– वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane case) हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचा पती, सासरे, सासू, दीर आणि नणंदेसह एकूण ११ आरोपींविरोधात पुणे न्यायालयात (Pune court) आरोपपत्र दाखल केले. या १६७० पानी दोषारोपपत्रात सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याची माहिती बावधन पोलीस (Bavdhan Police)ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली. या प्रकरणी प्रथमवर्ग न्या. अलिशा बागल यांच्या न्यायालयात […]
आमदार संजय गायकवाडांवर अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई – आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याने कॅन्टीनच्या व्यवस्थापकाला मारहाण (assaulted)करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)आणि अन्य एका व्यक्तीविरुध्द मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station)अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल (social media) होऊन ४८ तास उलटून गेले तरी गायकवाड यांच्या गुन्हा दाखल न […]
जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरची अटल सेतूवरून आत्महत्या

मुंबई- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) काल रात्रीच्या सुमारास एका डॉक्टरने (Doctor) उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. डॉ. ओंकार भागवत कवितके (३२) असे या डॉक्टरचे नाव आहे. ते कळंबोली येथील रहिवासी होते. ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात कार्यरत होते. त्यांना पुलावरून उडी मारताना एका व्यक्तीने पाहिले आणि याबाबत पोलिसांना (Police) […]
महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगरांची ६ तास चौकशी

बीड – बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde murder)यांची परळीत तहसील कार्यालय परिसरात २० ऑक्टोबर २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती.या हत्येमागे मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh case)मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या (Valmik Karad)रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा हात असल्याचा दावा कराडचा जुना सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर (Bala Vijaysinh Bangar)याने केला. यानंतर केज पोलिसांनी […]
पाटण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची हत्या

पाटणा – बिहारच्या पाटणातील (Patna ) प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका (Businessman Gopal Khemka) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते पाटण्यातील मोठे व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. ते मगध रूग्णालयाचे मालकही होते. २०१८ साली खेमका यांचे चिरंजीव गुंजन खेमका यांचीदेखील औद्योगिक पोलीस ठाण्याच्या परिसरात अशाच प्रकारे हत्या (Gunjan Khemka Murder )झाली होती. काल रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास […]
उत्तर प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडाचाअपघात! नवरदेवासह ८ ठार

लखनौ -उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका चारचाकीचा (four-wheeler) भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा जागीच तर आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. ६ जण जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण नवरदेवाला (Groom)घेऊन लग्नाला चालले होते. यावेळी त्यांची चारचाकी जुनावई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर जोरात […]
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल होणार

मुंबई – परभणी येथील संविधान (Constitution) शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणार्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi)या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांवर (police)गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench)दिला आहे. सोमनाथ याच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका (petition)दाखल केली होती. वकील प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर न्यायालयात सूर्यवंशी यांची […]
Shaktipeeth Mahamarg Protest |शक्तीपीठ महामार्गविरोधात आंदोलन केल्याने राजू शेट्टींसह ४०० जणांवर गुन्हा

कोल्हापूर – महायुती (Mahayuti) सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात (Shaktipeeth Mahamarg Protest) काल राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers) केले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. आंदोलकांनी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून निदर्शने केली. या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) […]
रतलाममध्ये सोनम-राजाच्या वस्तू आणि कागदपत्रे सापडली

इंदूर – राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील (Raja Raghuvanshi murder case) आरोपी शिलोम जेम्स याच्याशी संबंधित असलेल्या रतलाम येथील एका फ्लॅटमधून सोनम व राजा रघुवंशी यांचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांसोबत एक लॅपटॉप (Laptop), पेन ड्राइव्ह (Pen drive) व अनेक महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी हस्तगत केली. ईस्ट खासी हिल्सचे पोलीस (Police) अधीक्षक विवेक सिएम यांनी सांगितले […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिकेने अतिक्रमणविरोधात मोठी मोहीम राबवली. मुकुंदवाडी ते केंब्रिजपर्यंत सुमारे तीन हजार व्यावसायिक बांधकामांचे पाडकाम करण्याचे काम आज सुरू करण्यात आले. या कारवाईसाठी महानगरपालिकेचे साडेतीनशे अधिकारी (municipal officers) आणि कर्मचारी तसेच चारशे पोलीस (police)अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. साठ मीटर रुंदीच्या हद्दीत येणारी सर्व बांधकामे हटवण्यासाठी जेसीबी […]
अमरावतीत ठाकरेंच्या शिवसैनिकाची आत्महत्या! चिठ्ठीत ४ जणांचा उल्लेख

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील राठीनगरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक (Former APMC Director)आणि उबाठाच्या शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल बाबासाहेब राणे (Gopal Babasaheb Rane) यांनी आत्महत्या (suicide) केली. शेतावरील (farmland)अतिक्रमण आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (suicide note)४ जणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या शेतावर अतिक्रमण करून मानसिक त्रास (mental […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यात ! काळे झेंडे, आत्मदहन आंदोलन

जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव (Jalgaon) दौऱ्यात आज विविध कार्यक्रमांचे उद्घाटन (Inaugurations) व भूमिपूजन (foundation)पार पडले. तर दुसरीकडे त्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन, विरोध आणि आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे गोंधळ निर्माण झाला. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात […]
सरकारच्या लेखी आश्वासनानंतर बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित

अमरावती – प्रहार संघटेनेचे नेते बच्चू कडू (Former MLA Bacchu Kadu)हे शेतकरी आणि दिव्यांगच्या विविध मागण्यासाठी ७ जूनपासून अन्नत्याग आंदोलन करत होते. आज सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन (hunger strike) स्थगित केले. त्यांनी सरकारला ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. तोपर्यंत सरकारने काहीही पावले उचलली नाहीत तर मंत्रालयात येऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या […]
इंदापूरमध्ये पोलीस हवालदार बेपत्ता; पोलीस निरीक्षकावर धमकीचा आरोप

पुणे – पुण्यातील इंदापूर पोलीस (Police) ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे कालपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहून ठेवलेल्या एका चिठ्ठीमुळे खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीत त्यांनी थेट इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. केमदारणे यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून […]
सैन्य व पोलीस भरतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक

नवी दिल्ली- सैन्यात व पोलीस दलात भरतीसाठी प्रशिक्षण व आश्वासन देणाऱ्या युट्यूब व्हिडियो द्वारे देशातील शेकडो युवकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अरविंद पांडे व त्याची महिला सहाय्यक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे भारतीय पुलिस प्रोटेक्शन फोर्स नावाचे संकेतस्थळही बंद करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.अरविंद पांडे नावाच्या […]
सतेज पाटलांच्या परवानगीने निलेश चव्हाणला शस्त्र परवाना?

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याला काॅंग्रेसचे तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या परवानगीने शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, चव्हाणवर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही ही माहिती लपवून त्याला परवाना देण्यात आला. २०२२ मध्ये निलेश चव्हाणने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने पोलिसांनी […]
