संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

सोशल मीडियावर गुंतवणुकीचा सल्ला देणे पडले महागात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोशल मीडियावरून गुंतवणुकीच्या टिप्स देणे कायद्याने गुन्हा असतानाही हा व्यवसाय जोरात सुरू आहे. मात्र, सेबीने राबवलेल्या मोहिमेत व्हॉट्सअॅपवरून टिप्स देणाऱ्या सात व्यक्ती आणि एका कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या सल्लागारांचे पेव फुटले होते. या सल्लागारांची सेबीकडे नोंदणी नव्हती. त्यामुळे सेबीने याची दखल घेत गुजरातमधील अहमदाबाद, भावनगर, मध्य प्रदेशमधील नीमछ, दिल्ली आणि मुंबईत छापे मारले.

९ टेलिग्राम चॅनेल्सच्या माध्यमातून कथित सल्लागार गुंतवणुकीचा सल्ला देत होते. या ९ चॅनेल्समधून ५० लाखांहून अधिक सब्स्क्राबयर आहेत. या सल्ल्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सकवले जात होते. जेणेकरून कृत्रिमरीत्या शेअरच्या किमती आणि व्हॉल्यूममध्ये वाढ करता येईल. त्यानंतर या कंपन्या नफा कमवून वधारलेल्या दरावर शेअर्सची विक्री करत होते. याचा फटका लहान गुंतवणूकदारांना बसत होता. त्यामुळे सेबीने छापा टाकला. या छाप्यात सेबीने कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स जप्त केले. त्याशिवाय लॅपटॉप, मोबाइल फोन्स, डेस्कटॉप, टॅबलेट्स, हार्डड्राइव्ह, पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. याचा वापर करून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना टिप्स दिल्या जात होत्या. सेबी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे. 

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami