संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

राकेश झुनझुनवाला यांच्या ‘या’ शेअरमध्ये २५ टक्क्यांची वाढ अपेक्षित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शेअर मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओमध्ये असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स स्टॉक सध्या प्रचंड तेजीत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना या स्टॉक मध्ये चांगला परतावा मिळू शकतो.

स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरच्या किमतीत गुरुवारी प्रति शेअर रु.32.20 ची वाढ झाली. ज्यामुळे या स्टॉकमधील राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती जवळपास रु.325 कोटींनी वाढली. स्टार हेल्थच्या शेअरची किंमत सध्याच्या रु. 641 च्या किंमतीवरून 806 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर जाऊ शकते. म्हणजेच त्यात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

“स्टार हेल्थ इन्शुरन्स (STAR) ही भारतातील आघाडीची आरोग्य विमा कंपनी आहे ज्याचा किरकोळ आरोग्य विमा विभागातील 32% बाजार हिस्सा आहे. कंपनीकडे 0.53 दशलक्ष एजंट्सचे मजबूत नेटवर्क आहे. 12,000 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स व्यतिरिक्त, 9MFY22 च्या 737 शाखा आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami