जबलपूर- ओडिशातील रेल्वे अपघात ताजा असतानाच मध्य प्रदेशातील जबलपूर येथील शाहपुरा भिटोनीमध्ये मंगळवारी रात्री मालगाडीच्या एलपीजी गॅस रेकच्या दोन बोगी रुळावरून घसरल्या. मात्र मुख्य मार्गावर रेल्वेची वाहतूक सुरळीत होती. तसेच या घटनेत सुदेवाने कोणताही जिवीतहानी झाली नाही.
जबलपूरमधील शाहपुरा भिटोनी येथे काल रात्री मालगाडीच्या एलपीजी गॅस रेकच्या दोन वॅगन्स उतरवल्या जात असताना रुळावरून घसरल्या. रात्री याबाबत कोणतेही काम सुरु झाले नाही. आज सकाळी साईडिंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचे काम सुरू केले. काही तासांनंतर या दोन बोगी हटवण्यात आल्या. रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसून मुख्य मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू असल्याची माहिती पश्चिम मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातानंतर आता जबलपूर रेल्वे विभागात दोन रेल्वे अपघात झाले आहेत. 6 जून रोजी रात्री 7.30 च्या सुमारास कटनी येथील रेल्वे यार्डात मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले. या घटनेनंतर चार तासांनी म्हणजे रात्री 10.30 वाजता भिटोनी येथे गॅसने भरलेली मालगाडी रुळावरून घसरली.
जबलपूरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरुन घसरली
