मुंबई – देशाचा यंदा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने दादरच्या राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणस्नेही सजावट केली आहे. देशातील सर्व नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सीमेवर 365 दिवस कार्यरत असणाऱ्या सर्व पायदळ, नौदल आणि वायू सेनेतील सर्व जवानांना या सजावटीतून अभिवादन करण्यात आले आहे.
कप आर्ट (Cup Art ) च्या साहाय्याने भारतीय ध्वजाची प्रतिमा हृषीकेश बाणावलकर ह्यांचा संकल्पनेनुसार साकारण्यात आली. तसेच भिंती वरील सर्व चित्र जॉलि मामेन यांनी केले आहे.