संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 29 January 2023

दिनविशेष! अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा आज स्मृतिदिन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जेष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला.
पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले.

एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. १९२८ मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले.

पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते १७ वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते १४ वर्षांचे. पृथ्वीराज कपूर यांनी मुगल-ए-आझम या सिनेमात साकारलेली अकबरची भूमिका अविस्मरणीय आहे. पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले एक मुलगी. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशि कपूर व उर्मिला सियाल.

आपले आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतचा ऋषी कपूर यांचा लहानपणाचा एक किस्सा एका पुस्तकातील.
‘लहानपणीच चित्रपटसृष्टीशी माझी ओळख झाल्याबद्दल मी खरोखरच खूप ऋणी आहे. हिंदी सिनेमातल्या काही ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदारही आहे. त्यावेळी मी साधारण सहा वर्षांचा होतो. आजोबांनी (पृथ्वीराज कपूर) डब्बू (रणधीर कपूर), रितू (रितू नंदा) आणि मी.. असं आम्हा तिघांना गोळा केलं, अक्षरश: आम्हा तिघांचं गाठोडं करून त्यांच्या छोट्याशा ओपेल कारमध्ये घातलं आणि असीफसाब (के. असीफ) दिग्दर्शित करीत असलेल्या मुगल-ए-आझम या ऐतिहासिक चित्रपटाच्या भव्यदिव्य अशा सेटवर ते आम्हाला घेऊन गेले.

मला मात्र खुद्द ‘अकबर बादशहा’नंच आपलं बोट धरून या चित्रपटाच्या सेटवर नेल्याच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होता आलं. माझ्या आयुष्यातली ती रणरणती दुपार म्हणजे एक अमूल्य असा ठेवा आहे. त्या दिवसाचा क्षण अन् क्षण आजही माझ्या मनात अगदी आज, आत्ता घडल्यासारखा ताजा, रसरशीत आणि जिवंत आहे. भारत सरकारने पृथ्वीराज कपूर यांना ‘पद्मभूषण पुरस्काराने’ सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांनी कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेला आणि हिंदी सिनेसृष्टीला मोलाचे योगदान दिले. पृथ्वीराज कपूर यांचे निधन २९ मे १९७२ रोजी झाले. आपल्या समुहा तर्फे पृथ्वीराज कपूर यांना आदरांजली.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami