संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

लॉकडाऊन आणि युद्धाच्या काळातही भरघोस परतावा देणारी कंपनी Polyplex Corporation Ltd.

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान जागतिक शेअर बाजारात उलथापालथ होत असताना पॉलीप्लेक्स कंपनीचा शेअर मात्र ग्रीन ट्रेंडमध्ये कायम राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म कंपनीच्या शेअर्सच्यावर ट्रेड करत आहे. शेअरमधील तेजीचे हे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना ९६३ टक्के परतावा दिला आहे. गेल्यावर्षी या कंपनीच्या शेअरची किंमत ९०० रुपयांच्या घरात होती. मात्र, आज (९ मार्च २०२२ रोजी) या शेअरची किंमत १८६४ झाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅपिटल ६ हजार २४७.१० कोटी रुपये आहे. ५२ आठवड्यातील उच्चांक २ हजार १५० रुपये आहे. १० फेब्रुवारी रोजी हा उच्चांक होता. तर सर्वांत निच्चांक ७६१ रुपये आहे. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी या शेअरने हा निच्चांक गाठला होता.
तर, डिसेंबर २०२१ च्या तिमाहित या कंपनीने ४२ टक्के नफा कमावला आहे.

पॉलिस्टर फिल्म (PET Film) तयार करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी म्हणजे Polyplex Corporation Ltd. (Polyplex).या कंपनीकडून पातळ आणि जाड पीईटी फिल्म तयार केले जाते. मेटालायझिंग, होलोग्राफी, सिलिकॉन कोटिंग, ऑफलाइन केमिकल कोटिंग, एक्सट्रुजन कोटिंग आणि ट्रान्सफर मेटॅलाइज्ड पेपरच्या डाऊनस्ट्रिमचेही काम केले जाते. युरोप, अमेरिका, भारतीय उपखंड, सुदूर पूर्व, आशिया पॅसिफिक आणि मध्य पूर्वमधील 75 देशांमध्ये सुमारे 1950 ग्राहकांना या कंपनीकडून सेवा दिली जाते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami