अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला

मुंबई- शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचे मुंबई हायकोर्टाने आज अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी यांची सीबीआय तपासाची मागणी करणारी याचिका स्वीकारली.
सुनावणीत युक्तिवाद करताना तेजस्विनी घोसाळकरांच्या वकिलाने सांगितले की,अभिषेक यांच्या हत्येचा कट रचणारे खरे सूत्रधार अजून मोकाट आहेत. अभिषेक यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी-सूत्रधारांचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी गांभीर्याने तपास केलेला नाही. त्यामुळे खरे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केले.
या याचिकेत तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले होते की, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या कटातील सूत्रधारांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे आणि योग्य तपास करण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्याचे निर्देश द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top