ॲमेझॉन नदीच्या निग्रो उपनदीची १२२ वर्षांतील सर्वात खालच्या पातळी

मॅनौस – ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या मुख्य उपनद्यांपैकी निग्रो नदी १२२ वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर गेली. दुष्काळामुळे निग्रो नदीच्या पाण्याची पातळी पुढील आठवड्यात आणखी घसरण्याची शक्यता आहे.या नदीची पातळी २१ मीटर होती. मात्र ती आता १२.६६ मीटर इतकी झाली आहे. निग्रो नदीवर व्यवसाय करणारे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यासोबत मूलभूत दैनंदिन कामे करणे अशक्य झाले आहे. २८ वर्षीय ग्रॅसिटा बार्बोसा निग्रो नदीवर तरंगत्या दुकानात कॅशियर म्हणून काम करते. मात्र नदीचे पाणी आडल्याने दुकान बंद झाले आहे. राष्ट्रीयआपत्ती दलाने सांगितले की, ब्राझीलमध्ये १९५० च्या दशकानंतरचा हा सर्वात भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळामुळे ब्राझीलमधील विजेचा मुख्य स्त्रोत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे. अतिहवामान आणि कोरडेपणा दक्षिण अमेरिकेच्या अनेक भागांवर परिणाम करत असून, पॅराग्वे नदी देखील सर्वात खालच्या पातळीवर आहे. ही नदी ब्राझीलमध्ये सुरू होते आणि पॅराग्वे आणि अर्जेंटिनामधून अटलांटिकमध्ये वाहते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top