४ ईव्हीएम सील तुटलेले मतमोजणी थांबवली

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात मतमोजणी सुरू असताना चार ईव्हीएम मशीनचे सील तुटलेल्या अवस्थेत, तर एक मशीन बदलल्याचे आढळले. मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने याबाबत आक्षेप घेत मशीनचे सील कसे तुटले, अशी विचारणा केली. त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप व भाजपाचे देवराव भोंगळे यांच्यात चुरशीची लढत आहे. मतमोजणी थांबवण्यात आली, तेव्हा काँग्रेसचे सुभाष धोटे १५०० मतांनी आघाडीवर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top