मुंबई – इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडली आणि तुतारी हाती घेतली. राष्ट्र्वादी शरदचंद्र पवार गटाकडून त्यांनी इंदापूर विधानसभेत अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. या पराभवानंतर महिनाही उलटत नाही तोच हर्षवर्धन पाटील यांनी आज सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या अशी चर्चा आहे. आता ते पुन्हा शरद पवार गट सोडून भाजपात परतणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या एक्स हँडलवर सहकुटुंब फडणवीसांसोबत भेटीचा फोटो पोस्ट केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो जुना असल्याचेही सांगण्यात येत आहे.