शिरुर – दौंड तालुक्यातील रांजणगाव सांडस-वाळकी बेट येथील थोर संत श्री संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, शिरुर भूषण, ह.भ.प.सुरेश अण्णा साठे महाराज यांचे आज रविवारी पहाटे साडेचार वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. नागरगाव येथील राहत्या घरी निधन झाले.
रांजणगाव सांडस संगम-वाळकी बेट येथील वारकरी सांप्रदयाचे श्रद्धास्थान, थोर संत श्री संतराज महाराज देवस्थानचे साठे महाराज हे २० वर्षांपासून आजतागायत अध्यक्ष होते सुरेश साठे महाराजांनी श्री संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष झाल्यापासून देवस्थानच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देवस्थानचा विकास करून देवस्थान नव्याने नावारूपाला आणले. त्यामुळे देवस्थानच्या विकासासाठी साठे महाराज यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर,दौंड, बारामती, हवेली, पुरंदर, आंबेगाव, खेड त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर या परिसरामध्ये साठे महाराजांना मानणारा भक्त वर्ग मोठ्या संख्येने आहे.