सुरतमध्ये गणेश मंडपावर दगडफेक! शहरात तणाव

सुरत- सुरतच्या लालगेट या भागातील एका गणेशमंडळावर ६ तरुणांनी काल रात्री दगडफेक केली. या दगडफेकीच्या विरोधात लोकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. त्यानंतर दगडफेक करणाऱ्या ६ जणांना व त्यांना समर्थन देणाऱ्या २७ जणांना अटक करण्यात आली आहे.इतर धर्माच्या तरुणांनी ही दगडफेक केल्यामुळे दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ३५ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. विविध धर्माचे लोक राहात असलेल्या वस्त्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून ड्रोनच्या सहाय्याने स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नानपुरा, रांदेर, महाराणा प्रताप सर्कलसह भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या गणेशमंडळाच्या मंडपावर दगडफेक झाली त्या मंडळाच्या आयोजकांनी म्हटले आहे की, दगडफेक झाली असली तरी मूर्तीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top