प्रिटोरिया – सिरिल रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ४०० सदस्यांच्या सभागृहात रामाफोसा यांना २८३ तर त्यांचे प्रतिस्पर्धी ज्युलियस मालेमा यांना केवळ ३८ मते मिळाली.
आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) आणि त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी प्रो-बिझनेस डेमोक्रॅटिक अलायन्सने काल दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय एकतेच्या नवीन सरकारमध्ये एकत्र काम करण्यास सहमती दर्शविली. दोन कट्टर विरोधी पक्षांमधील हा करार दक्षिण आफ्रिकेच्या 30 वर्षांच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा राजकीय बदल आहे. या करारामुळे सिरिल रामाफोसा यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवता आले आहे. ते पुढील ५ वर्षे अध्यक्षपदी असतील.