नवी दिल्ली – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ‘ द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दगडफेकीची घटना घडली आहे. डाव्या विद्यार्थी संघटनांनी ही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. बॅडमिंटन कोर्टवर या चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू होते. गुजरातमधील गोध्रा घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. स्क्रिनिंग सुरू असतानाच अचान कदगडफेक झाली. त्यानंतर विद्यार्थी पळू लागले. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली.