मुंबई
शेअर बाजारात आज गुंतवणुकदारांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चढ-उतार अनुभवला. सकाळी सुरुवातीला सेन्सेक्स ७२००० आणि निफ्टी २१८०० च्या पातळीवर होता. सेन्सेक्सने ७२,२६९.१२ चा उच्चांक गाठला, तर निफ्टी २१,९६४.३० वर पोहोचला. दुपारी सेन्सेक्स १९१.३६ अंकांनी वाढून ७२,२७६.९८ वर आणि निफ्टी ८७.२५ अंकांनी वाढून २१,९४१.०५ वर होता. मात्र, अखेरच्या सत्रात बाजाराने दिवसाची नीचांकी पातळी गाठली. सेन्सेक्स सुमारे ४५० अंकांनी घसरला आणि ७१,७०० च्या खाली घसरला. निफ्टीही १००अंकांनी घसरून २१,७५० च्या खाली आला. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स ३५४ अंकांनी घसरून ७१,७३१ वर आला. निफ्टीही ८२ अंकांनी घसरून २१,७७१ वर बंद झाला.