मुंबई- महाराष्ट्रात शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा वापर थांबवावा आणि त्यावर बंदी घालावी अशी मागणी शिक्षकतज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येत असल्याचा दावा डॉ. खडक्कार यांनी दिला आहे.
डॉ. संजय खडक्कार म्हणाले की, स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित राहत नाही. त्यामुळे त्यांची शैक्षणिक कामगिरी कमकुवत होते. याशिवाय, मोबाईलमध्ये सहज उपलब्ध असलेल्या कॅल्क्युलेटरमुळे विद्यार्थ्यांचे गणिती कौशल्य विकसित होत नाही. त्यामुळे शाळांमध्ये स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
