वायनाडमध्ये कारने आदिवासीला अर्धा किलोमीटर फरपटत नेले

वायनाड – कारच्या दरवाज्यात अंगठा अडकल्याने एका आदिवासी युवकाला सुमारे ५०० मीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना वायनाड जिल्ह्यात घडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मनंतवाडी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी सांगितले की, कुडलकडावू येथील चेम्मड आदिवासी वस्तीत राहणार्या माथनला चेक डॅम येथे आलेल्या पर्यटकांनी त्यांच्या कारसोबत फरपटत नेले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. वायनाडमधील कनिअमबट्टा येथील हर्षिद आणि त्याचे मित्र या प्रकरणातील आरोपी आहेत. घटनेतील मारुती सेलेरियो कार कुट्टीपुरम येथील मूळ रहिवासी असलेल्या मोहम्मद रियासच्या नावावर नोंदणीकृत आहे. सदर कार पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटना घडली त्यावेळी कारमध्ये चार जण होते. मानंतवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये ११० हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. घटना घडली त्यादिवशी या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. माथनसह स्थानिकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात माथवनचा अंगठा कारच्या दरवाजात अडकला. त्याने गाडी थांबवण्यासाठी वारंवार विनंती करून गाडीच्या आत असलेल्यांनी त्याला सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्यावर फरपटत नेले. राज्याचे अनुसूचित जाती,जमाती मंत्री केलू यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top