वायनाड – दुर्घटनेतील बळींची संख्या १८५२२५ जण बेपत्ता !लष्कराकडून मदतकार्यवायनाडवायनाडच्या मुंडक्कल, चुरामाला या भागात काल दरडी कोसळून झालेल्या निसर्गाच्या प्रकोपातील बळींची संख्या १८५ वर गेली असून ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेह असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील २२५ जण बेपत्ता असून शेकडो जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वायनाडच्या आजूबाजूच्या भागात दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. लष्करी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना अन्न व इतर मदत सामुग्री पोहोचवण्यात येत आहे. भाजपाने या दुर्घटनेचा सारा दोष केरळ सरकारवर टाकला आहे.वायनाडच्या डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने काल मध्यरात्री या भागातील अनेक घरांवर दरडी कोसळल्या. बेसावध असलेले लोक या दरडींखाली दबले गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबरही अनेक जण वाहून गेले. हा प्रवाह इतका जोरदार होता की, दुर्घटनेतील ५१ मृतदेह २० किलोमीटर दूर चलियार नदीत सापडले. लष्कराच्या बचाव पथकाने आज या भागातून आणखी ७१ मृतदेह बाहेर काढले असून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. यातील काही मृतदेहांचे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले असून मृतदेहांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. वायनाडच्या मेपाडी जुम्मा मशिदीजवळच्या दफनभूमीतही अनेक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे.दरडी कोसळल्यामुळे मुडक्कल ते चुरामाला गावांना जोडणारा पूलही वाहून गेला. त्यामुळे डोंगराळ प्रदेशात जड यंत्रसामुग्री नेण्यात अडचणी येत आहेत. लष्कराच्या वतीने या ठिकाणी बेली पूल बांधण्यात येत आहे. उद्यापर्यंत या पुलांचे काम पूर्ण झाल्यावर मदतकार्यात वेग येईल, असे केरळच्या प्रशासनाने म्हटले आहे. दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांमध्ये सरकारी शाळांमधील अनेक विद्यार्थी स्वयंसेवकांची भूमिका बजावत आहेत. शिक्षकांनीही या मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर बचतकार्य सुरू असताना भाजपाने या प्रकरणी राज्य सरकारवर आरोप केला की, केंद्र सरकारने या आपत्तीसंदर्भातील आगाऊ इशारा आधीच दिला होता. तरीही केरळ सरकारने येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले नाही. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनीही या दुर्घटनेवरून केरळच्या मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र या नैसर्गिक आपत्तीत आपण केरळ सरकारसोबत असून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वास दिला आहे. वायनाड परिसरात आगामी २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |