मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याला कनिष्ठ न्यायालयाच्या व निकालाला आव्हान द्यायचे असते, तेव्हा ही स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल केली जाते. २५ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला होता. या प्रकरणातील तथ्ये लक्षात घेऊन विशेष अपवाद करण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. मिहीर याने आता त्याचे वकील जय भारद्वाज, दिशा बजाज आणि सिद्धार्थ शर्मा यांच्यामार्फत ही विशेष याचिका दाखल केली आहे.