रिअल इस्टेट एजंटच्या पाचव्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

मुंबई – इस्टेट एजंट अर्थात स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४७६९ पैकी ४१६५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या पाचव्या परीक्षेचा निकाल ८७ टक्के लागला आहे. पाचव्या परीक्षेला ४७६९ उमेदवार बसले होते. या निकालात मुंबईच्या शरद मोटा आणि पुण्याच्या दिवेश माहेश्वरी या दोघांनी १०० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे.

महारेराने १० जानेवारी २३च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे.राज्यात सुमारे ४७ हजार एजंट्स नोंदणीकृत होते.यापैकी १३ हजार ७८५ एजंटसनी नुतनीकरण न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर एप्रिल अखेर महारेराने २० हजार पेक्षा जास्त एजंटसनी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविण्याच्या अटींची ३१ डिसेंबरपर्यंत पूर्तता केली नाही म्हणून त्यांची नोंदणी स्थगित करून त्यांना काही अटींसापेक्ष या क्षेत्रात काम करायला बंदी घातलेली आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते, एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्याब हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहि आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.
दरम्यान, पहिली परीक्षा ४१६५, दुसरी परीक्षा ४०५, तिसरी परीक्षा २८१२, चौथी परीक्षा ४४६१ आणि पाचवी परीक्षा १५२७ असे एकूण १३,३७० एजंट पात्र ठरले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top