मुंबई
महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा अमरावती, हिंगोली, लातूर, वाशीम, आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळीचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात उद्यापासून पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली असून मुंबईतदेखील उष्णतेची लाट जाणवत आहे. हे तापमान पुढील चार दिवस कायम राहण्याची शक्यता आ