पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे १० फेब्रवारी रोजी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ३ दिवसांचा असेल. १०, ११ आणि १२ फेब्रुवारी असे दौऱ्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरे विविध विकासकामाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच १२ तारखेला ठाकरे पदाधिकाऱ्य़ांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान पुणे लोकसभेच्या मनसेच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे लोकसभा उमेदवारीसाठी शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागस्कर, वसंत मोरे यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.